Ad will apear here
Next
बँक ऑफ बडोदातर्फे किसान पंधरवड्याचे आयोजन
शेतकऱ्यांसाठी विशेष अॅप
बँक ऑफ बडोदातर्फे आयोजित किसान पंधरवड्याबाबत बँकेच्या पुणे परिमंडळाचे प्रमुख के. के. चौधरी यांनी माहिती दिली. या वेळी (डावीकडून) पुणे परिमंडळाचे उपप्रमुख हरीश चंद, चौधरी व पुणे शहर विभागाचे प्रमुख डी. के. पंचोरी

पुणे : बँक ऑफ बडोदाने शेतकऱ्यांसाठी एक ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान बडोदा किसान पंधरवड्याचे आयोजन केले असून, त्याअंतर्गत शेती क्षेत्रातील कर्जाचे प्रमाण वाढवण्याचा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा उद्देश आहे,’ अशी माहिती बँकेच्या पुणे परिमंडळाचे प्रमुख के. के. चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पुणे परिमंडळाचे उपप्रमुख हरीश चंद, पुणे शहर विभागाचे प्रमुख डी. के. पंचोरी उपस्थित होते. 

‘बँक ऑफ बडोदाने गेल्या वर्षी देशभरात बडोदा किसान पंधरवडा हा उपक्रम सुरू केला होता, त्याला प्रचंड यश मिळाले होते. बँकेच्या विविध शाखांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दोन लाख ४० हजार ८१७ शेतकऱ्यांचा फायदा झाला होता. या वर्षीही हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. जागतिक अन्न दिवसाचे औचित्य साधून १६ ऑक्टोबर रोजी या उपक्रमाची सांगता केली जाणार आहे. ‘बडोदा किसान दिवस’ उपक्रमाअंतर्गत  बँकेच्या शाखांद्वारे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये शेतकरी मेळावे, गावात रात्रीच्या बैठका, शेतकरी तसेच गायीगुरांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, आर्थिक साक्षरता शिबिरे, शेतकऱ्यांचा सत्कार आदी कार्यक्रमांचा समावेश आहे,’ असेही चौधरी यांनी सांगितले.   

‘बँकेने शेतकऱ्यांसाठी ‘बरोडा किसान’ हे विशेष अॅप तयार केले असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना कर्ज सुविधा, खाते, कीटकनाशके खरेदी, तज्ज्ञांचा सल्ला, मृदा तपासणी, शेतीसंबधी मार्गदर्शन आदी सुविधा उपलब्ध आहेत,’ अशी माहिती चौधरी यांनी या वेळी दिली.

‘या अॅपला ग्राहकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या हे अॅप अँड्रॉइड मोबाइल्सवर उपलब्ध असून, लवकरच आयओएस मोबाइल्सवर उपलब्ध होईल; तसेच सध्या  इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध असलेले हे अॅप लवकरच अन्य १५ स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध होईल,’ असेही चौधरी म्हणाले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZQCCE
Similar Posts
मुलांनी घेतला भात लावणीचा अनुभव पुणे : वारजे येथील ‘श्री प्रल्हादराव काशिद फाउंडेशन’च्या मातोश्री नॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मुळशी येथे भात लावणीचा अनुभव घेतला. या विद्यार्थ्यांनी नुकतीच कातवडी गावाला भेट दिली आणि तेथील भातशेतीत स्वतः भात लावणी केली
बँक ऑफ बडोदा देशातील दुसरी मोठी सार्वजनिक बँक पुणे : विजया बँक व देना बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झाल्याने, एक एप्रिल २०१९ पासून बँक ऑफ बडोदा ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणून उदयास आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० मार्च २०१९ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विजया बँक व देना बँक यांच्या सर्व शाखा एक एप्रिलपासून
माती-पाण्याविना शेती; नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांची मुले दुबईला पुणे : माती व पाण्याशिवाय केवळ हवेतील प्राणवायूवर केल्या जाणाऱ्या शेतीचे ‘एरोपोनिक्स’ हे नवीन तंत्रज्ञान अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेने मंगळावर शेती करण्यासाठी विकसित केले आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी पुण्यात शिकणारी शेतकऱ्यांची पाच मुले दुबईला जात आहेत. गणेश अहेर, सौरभ चौधरी, अबूबाकर शेख, मदिपल्ली
उद्योजकता विकासासाठी बीव्हीजी-डिक्की एकत्र पुणे : शेतकऱ्यांमधून उद्योजक निर्माण करण्यासाठी ‘बीव्हीजी उद्योग समूह’ आणि ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’ (डिक्की) एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language